हत्ती गवत हे चारा पीक कोणत्याही जमिनीत कमी पाणी असताना देखील उत्तम प्रकारे वाढत असते. बांधावर देखील याची काडी लावून आपण लागण करू शकतो. या चारा पिकाला कोणत्याही प्रकारचे रोग येत नसल्याने तसेच उत्पादन चांगले मिळत असल्याने पशुपालकांनी याची मोठ्या प्रमाणात लागण केलेली दिसते. प्रोटीनचे प्रमाण देखील 8-9%* असते.
या चारा पिकाची लागण 3×3 फुटावर करू शकतो. 4×3 फुटावर लागण केल्यास यंत्रच्या मदतीने मशागत करता येते. हि प्राथमिक माहिती पशुपालकांना आहे. परंतु पशुपालक हत्ती गवत लावताना चांगल्या जातीच्या ( नवीन ) चारा पिकाची निवड न करता मिळेल ते गवत लावतात. तसेच कापनी योग्य वेळी करत नाहीत.
हत्ती गवताची कापणीची योग्य पद्धत
मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की हत्ती गवत 10-12 फूट वाढलेले असते. आणि आपणास वाटते की भरपूर चारा मिळेल. परंतु हि कापणीची चुकीची स्टेज आहे. कारण
1. हत्ती गवत जास्त काळाने कापल्यास त्याची पचनीयता कमी झालेली असते. त्यामुळे त्या पासून जेवढे अन्नघटक मिळायला हवेत ते मिळत नाही. म्हणजेच त्याची गुणवत्ता कमी होते.
काय करावे :हत्ती गवताची उंची पाच फूट झाल्यावर लगेच किंवा प्रत्येक कापणी दर दीड महिने पूर्ण झाल्यास करावी.(जी स्टेज पहिली येईल त्यानुसार ) चारा जास्त होत असेल तर त्यापासून मुरघास तयार करावा.
0 Comments