Recents in Beach

For More Details Call On 9673371785

शेतकऱ्यांनो उद्योजक व्हा....जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकारने केला मदतीचा हात पुढे


स्थापन करा शेतकरी उत्पादक कंपनी आणि उद्योजक व्हा, जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकारने केला मदतीचा हात पुढे ......!

शेतमालाला भाव नाही आणि शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या अशा बातम्यांचा काळ आता लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. शेतीमालाची उत्पादकता आणि बाजारमूल्यांची सांगड घालून नफा कमावण्याचे दिवस आता फार लांब राहिलेले नाहीत, कारण शेतकरीच आता उद्योजक बनणार आहेत !

शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा म्हणून आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकारच्या मदतीने स्वत:च उद्योजक बनण्याचा मार्ग सापडलेला आहे, राज्यातील शेतकरी गटांचे रूपांतर कंपन्यांमध्ये करण्यात येत असून, बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना करण्यात येत आहेत. येत्या मार्च २०१९ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकारच्या अर्थसहाय्यातून स्मार्ट (SMART) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्र अॅ्ग्रोबिझनेस अॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) (SMART) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार आहे. २३०० कोटी रुपये खर्चाची ही योजना असेल, तिचा ७० टक्के आर्थिक भार जागतिक बँक तर ३० टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. 


* काय आहे (स्मार्ट) (SMART) योजना ?

www.shetisalla.comया योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, प्राथमिक कृषी पतसंस्था, शासनाच्या व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन आदींकडून स्थानिक पातळीवर प्रक्रिया केलेला कृषी माल बड्या कंपन्या खरेदी करणार आहेत. शेतमाल थेट गावातून विकला जावा, गावागावात शेतकऱ्यांचे प्रक्रिया उद्योग उभे राहावेत, हा या योजनेमागचा उद्देश आहे.



या प्रकल्पाचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या गावांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे गरजेचे आहे.

* शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय ?

शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप आहे आणि हि कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते. शेतकरी उत्पादक कंपनी अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सदस्य असू शकतात आणि शेतकरी सदस्य स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये उत्पादक, खासकरून लहान आणि किरकोळ शेतक-यांचे संकलन समाविष्ट आहे जेणेकरुन शेतीतील अनेक आव्हाने एकत्रितपणे गुंतवून ठेवण्यासाठी एक प्रभावी गठबंधन तयार करणे, जसे की गुंतवणूक, तंत्रज्ञान, इनपुट आणि बाजारपेठेत सुधारित प्रवेश, शेती पिकांचे उत्पादन, कापणी, खरेदी, ग्रेडिंग, पूलिंग, हाताळणी, विपणन, विक्री, सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे किंवा वस्तू किंवा सेवा आयात करणे यासाठी अस्तित्वात येते.

सामूहिकरीत्या शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे, तसेच बाजार संपर्क व शेतमालाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांना नफा मिळू शकतो. 

शेतकरी कंपनीमार्फत कृषीआधारित विविध व्यवसाय सुरू करण्यात येतात़ यातून मिळणारा नफा व लाभांश शेतकरी सभासदांना विभागून मिळू शकतो.

* अशी स्थापन करता येते शेतकरी उत्पादक कंपनी़:

गावपातळीवरील १० शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी़ स्थापन करू शकतात तसेच एकापेक्षा जास्त गावे मिळून देखील शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली जाऊ शकते. या कंपन्यांची मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या डिपार्टमेंट कडे कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणी केली जाते.

* शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणारे विविध फायदे आणि योजना:

शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्ष तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही

सन २०१८-१९ च्या बजेट मध्ये सरकारने ऑपरेशन ग्रीनला मंजुरी दिलेली आहे.

सन २०१८-१९ च्या बजेट मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ५०० कोटी रुपयांचीची तरतूद केलेली आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता मिळते.

नाबार्ड कडून सवलतीच्या दारात कर्ज उपलब्ध होते तसेच विविध प्रकल्पांना अनुदान दिले जाते.

नाबार्ड च्या प्रोड्युसर ऑर्गनायजेशन डेव्हलोपमेंट फंड (PODF) तर्फे विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

कर्जावरील व्याज दर दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी असतो.

सहकारी संस्थाना दिल्या जाणाऱ्या विविध योजना आता शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुद्धा दिल्या जाणार आहेत.

समूह शेती तसेच समूह शेतीला लागणारे तंत्रज्ञान सरकार अगदी सुलभतेने उपलब्ध करून दिले जाणार आहे.

* इक्विटी  ग्रॅन्ट योजना:  SAFC, Delhi या संस्थेकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना १५ लाख रुपये पर्यंत इक्विटी ग्रॅन्ट दिली जाते.

* क्रेडिट ग्यारंटी फंड: SAFC, Delhi या संस्थेकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांच्या प्रोजेक्टच्या ८५% किंवा जास्तीत जास्त १ करोड रुपयापर्यंत कमी व्याज दाराने कर्ज दिले जाते. 

* अवजारे बँका: महाराष्ट्र राज्यात अनेक अवजारे बँका सुरु झालेल्या असून त्यामधून शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध प्रकारची अवजारे आणि यंत्र सामग्री भाडे तत्वावर आणि सुलभ हप्ताने दिली जाणार आहेत.

* स्मार्ट (SMART) प्रकल्प: जागतिक बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमाने राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्र अॅपग्रोबिझनेस अॅ ण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) (SMART) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार. २३०० कोटी रुपये खर्चाची ही योजना असेल, तिचा ७० टक्के आर्थिक भार जागतिक बँक तर ३० टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, प्राथमिक कृषी पतसंस्था, शासनाच्या व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन आदींकडून स्थानिक पातळीवर प्रक्रिया केलेला कृषी माल बड्या कंपन्या खरेदी करणार आहेत. विशेष म्हणजे त्यात अॅथमेझॉन, टाटा आदी कंपन्यांचा समावेश आहे.


शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी व इतर कायदेशीर बाबींचे व्यवस्थापन क्षेत्रात प्रमुख सेवा प्रदान करते. कंपनीने आजपर्यंत संपूर्ण भारतामध्ये अनेक उत्पादक कंपन्यांची नोंदणी केलेली आहे तसेच त्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांना इक्विटी ग्रांट व इतर शासकीय अनुदान घेण्यास मदत करते.

शेतकर्यांना त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीची (एफपीसी) १० ते १५ दिवसांच्या आत अतिशय कमी खर्चासह नोंदणी करण्यास मदत करते आणि राज्य आणि केंद्र सरकार द्वारे देण्यात येणाया इक्विटी ग्रांट आणि विविध योजना व सबसिडीज मिळविण्यास मदत करते.

शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करण्यासाठी तसेच उपरोक्त योजना, अनुदान आणि सबसिडीचा लाभ घेण्यासाठी  आजच संपर्क करावा.

RSP KRUSHI EXPERT LLP

*कार्यालय: ऑफिस न. १०१, पहिला मजला, हॅमी हाईट, भारती हॉस्पिटल समोर, पुणे-सातारा रोड, बालाजीनगर, पुणे – ४११०४३,*
*ई-मेल आयडी: ramsp2847@gmail.com
*संपर्क क्र.: + ९१७७७४८५६७१०


***जाहिरात***

www.shetisalla.com *शेतकरी सेवा हाच आमचा ठेवा*
प्रगतिशील शेतकरीकृषितज्ञकृषी शास्त्रज्ञकृषी अधिकारीकृषी संस्थांचे पदाधिकारीकृषी क्षेत्रातील विद्यार्थी  शेतीविषयक माहिती असणारे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व शेती प्रेमींना आवाहन... बदलत्या दुनियेत डिजिटल माध्यमांनी धूम घातली आहेप्रिंट मीडियाटीव्ही मीडिया यापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर आणि उपयोग वाढला आहेसर्वांना खुले व्यासपीठ मिळत आहेपण या समाज माध्यमांचा दुरुपयोग सुद्धा होत आहेआज प्रत्येक जण लेखक आहेप्रत्येक जण आपले विचार समाज माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहेजगाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपले ज्ञानसल्लाकृषीविषयक माहितीमहत्वपूर्ण सल्ला दिल्यास शेती क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईलजगाच्या पोशिंद्याला सक्षम करणेसाठी आपले अनमोल ज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहेशेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून हे ज्ञान आणि उपयुक्त माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहेकृषी क्षेत्रात सकरात्मक बदल घडविणारे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्याना या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तसेच आपली संकल्पना जगासमोर मांडण्याची संधी आहे.आपल्या कृषी विषयक संकल्पना तसेच भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथानाविन्यपूर्ण प्रयोगशेतीसल्लाउपयुक्त माहिती आपल्या नावसह प्रसिद्ध कराकृषी क्षेत्रात लिखाण करू इच्छिणाऱ्या शेतकरी  तज्ञांनी आपले लेखमाहिती  teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती आपले लेख माहिती इमेज/फोटो सह मराठी युनिकोड फॉन्ट मध्ये टाईप केलेले पाठवावे.



*मोफत जाहिरात*: आपली कृषी विषयक उत्पादने  सेवांची मोफत जाहिरात शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून करू शकतापोर्टलच्या माध्यमातून 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकर्यांच्यापर्यंत आपली जाहिरात माहिती पोहचवाशेतीविषयक महत्वपूर्ण माहिती  मार्गदर्शनपर लेखांच्या माध्यमातून आपली उत्पादने  सेवांची माहिती पोर्टलवर मोफत प्रसिद्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी आपल्याला शेती सल्ला पोर्टल देत आहेत्वरा कराएका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांशी जोडले जाआपले लेख माहिती जाहिरातीसह teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती पाठवा.
*अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470* www.shetisalla.com 

 नियम  अटी :
*लेख/आर्टिकल कमीत कमी 100 शब्दांचे असावे.
*सदर लेखाच्या आतमध्ये व्हिडीओ/इमेज  टेक्स्ट स्वरूपात जाहिरात करू शकता.
*लेख हे स्वतःचे असावेकॉपी नसावे.





For More Information Call On 8975307470 & 9673371785
For More Information Call On 8975307470 & 9673371785




Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments