Recents in Beach

For More Details Call On 9673371785

#शेतकरी जेव्हा 'कंपनी' काढतो...

शेती तर करतोय.. का करतोय? कशी करतोय? कुणासाठी करतोय? तेच कळत नव्हतं. अनेक वर्षांपासून हेच चाललं होतं.. आपत्तींशी लढताना हतबलता.. वाढत्या कर्जानं कंबरडं मोडून जायचं.. पुन्हा शेतमालाला बाजारात भाव नाही. स्वत:च्या शेतात चांगला उस पिकवून पण दरासाठी पुन्हा आंदोलन, मोर्चे. वर्षानुवर्षे हेच. काहीही करा लुटमार होणारच. पिकवतोय चांगल पण विकायचं कुठ आणि प्रक्रिया कुठ करायची. असे असंख्य प्रश्न उस उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. शेतकरी गटापासून सुरू झालेला उद्योजकतेचा प्रवास आता शेतकरी कंपनीच्या वळणावर येऊन पोहचलाय “ कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ” च्या माध्यमातून ही वाट स्वयंपूर्णतेकडे जाणारी आहे.


कडेगांव तालुक्यात बहुतांश शेती हि उस पिकाखाली आहे. आणि दुध हे दुय्यम उत्पादन उस पिकानंतर मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. उस आणि दुध उत्पादन हे नगदी नफा मिळवून देणारे असले तरी सर्व काही निसर्गाच्या कृपेवर आणि टेंभू-ताकारीच्या पाण्यावर अवलंबून आहे. उसाला आणि दुधाला जो भाव मिळेल, त्यावर समाधान मानायचे. वाढता उत्पादन खर्च, हुमणीचा प्रादुर्भाव आणि दिवसेंदिवस कमी होणारी जमिनीची उत्पादकता हे प्रश्न कधी सुटतील असे वाटत नाही. त्यामुळे कायस्वरूपीचा आर्थिक आणि सामजिक दुष्काळ आपल्या कडेगांव तालुक्याच्या पाचवीलाच पुजलाय. उसाचे जादा उत्पादन झाले तर दर कमी मिळणार, त्यात हि काटामारी आणि कारखानदारी. स्थितीत सुधारणा नाहीच. एक पाय उचलायला दुसरा पाय वर काढण्याचा प्रयत्न करावा तर पहिला अजूनच खोलात जायचा अशी गाळात अडकल्यासारखी अवस्था उस आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांची आहे.

यावर सामुहिकपणे पर्याय काढल्यास समाधान सापडेल असा विचार करून २०१३ साली शिवशक्ती शेतकरी स्वयंसहाय्यता गटाची स्थापना झाली. याचा मुख्य उद्देश शेतकरी सक्षमीकरण हाच होता. या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या सगळ्या योजना, सवलती शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याचे ठरविले आणि गेल्या पाच वर्षात शिवशक्तीच्या माध्यमातून सुमारे १२०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. त्याचबरोबर सुमारे २५ लक्ष रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे अनुदान या शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळाले. बचतीमधून अंतर्गत कर्जवाटपाची शेतकरी गटाने सुरुवात केली. त्यातून आधार मिळाला. पण, अजूनही काहीतरी करण्याची गटातील शेतकऱ्यांची इच्छा होती. कृषी विभागाच्या माध्यमातून “ शिवशक्ती कृषी औजारे बँक ” हि भाडेतत्वावर कृषी अवजारे आणि मशागत सुविधा सदस्यांना आणी शेतकऱ्यांना कमी दरात देण्याचे उद्दिष्ठ होते. यात बहुतांशी यशही मिळाले. पण तरीही उस आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न काही केल्या सुटेनात. यावर अभ्यासाने असे लक्षात आले कि, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या उस आणि दुध उत्पादनावर आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत सर्व प्रक्रिय स्वतः शेतकरी-उत्पादक यांनी राबविली तर प्रश्न मिटू शकतो.

आपल्या शेतात, गोठ्यात पिकलेला उस आणि दुध यावर स्वतःच सामूहिकरीत्या प्रक्रिया केली आणि त्याचे उपपदार्थ अंतराष्ट्रीय-राष्ट्रीय बाजारात जास्त भावाने विकल्यास हाती चार पैसे अधिक येतील. आणि उस व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे, बेरोजगारी, लाचारी, हमीभावाच्या अडचणी हे प्रश्न कायमस्वरूपी सुटतील. हे ओळखून आम्ही “ कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ” या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. ध्येय एकच ‘ शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण ’
आपल्यापेक्षा जास्त उस उत्पादन असणाऱ्या ब्राझील धर्तीवर उस आणि दुध प्रक्रिया उद्योगासाठी आपल्या कडेगांव भागात मोठा वाव आहे. येथील उस आणि दुध उत्पादनांवर ब्राझील धर्तीवर नवीन राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय बाजारात जास्त मागणी असणारे खाद्यपदार्थ याच ठिकाणी प्रक्रिया करून निर्माण झाल्यास त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल. समूह-गटाच्या माध्यमातून उद्योजक होण्याची संधी शेतकऱ्यांना आहेच.त्याचबरोबर स्थानिक ठिकाणी सामूहिकरीत्या शेतमालावर प्रक्रिया केल्यास चांगला दर मिळतो, हे सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे आम्हाल माहिती आहे. यासाठी आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी शासकीय आणि खाजगी योजना आहेत. आता आपल्याला चांगले काम करता येऊ शकेल. स्थानिक ठिकाणीच सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी बंधनकारक नियमावलीच “कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ” ची आहे. आता शेतकऱ्याने जागे झाले पाहिजे. व्यापारी दलाल, कारखानदार यांच्या साखळीत शेतकऱ्याचा फुटबॉल झाला आहे. आता शेतकऱ्यांनी स्वतःला बाजूला करून स्वतःच असे प्रक्रिया उद्योग स्थापन केले पाहिजेत आणि यासाठी “कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ” ; शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण या शेतकरी विकासाच्या, सक्षमीकरणाच्या चळवळीत आणि नवनिर्मितीत सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. आणि आपली आर्थिक- सामजिक प्रगती साधून आपल्याला व आपल्या कुटुंबाला स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी “कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ” या आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स घेऊन सभासद व्हावे हि नम्रतेची विंनती.


आपलाच,
प्रमोद महादेव मांडवे
चेअरमन, कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड

Call on 8975307470,9890098265#शेअर्स : सर्व इच्छुक शेतकरी व नागरिक आणि बंधू भगिनींनो आपल्या कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चे शेअर्स खालीलप्रमाणे दिले जात आहे. कंपनीचा एक शशेअर रु. १०००/रुपये किंमतीचा असून सभासदांना किमान एकशेअर घ्यावे लागेल त्याची किंमत रु. १,०००/- रुपये तसेच प्रवेश फी रु. १००/- रुपये असे एकूण रु. ११,००/- रुपये एक हजार शंभर रपये फक्त आहे. सदर रक्कम चेक, डीडी, NEFT, इंटरनेट बँकिंगद्वारे कंपनीच्या खात्यावर जमा करावी. पारदर्शकता असावी यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८९७५३०७४७०, ९८९००९८२६५, ९९६०००७३८३

CIN NO. : U01400PN2018PTC179761
PAN NO. : AAHCK3348P
TAN NO. : KLPK03069D
BANK A/C.: BANK OF MAHARSHTRA
BRANCH.: KADEGAON
A/C. NO.: 60317650012
ISFC CODE .: MAHB0001636#KADEGAON TALUKA FARMERS PRODUCER COMPANY LIMTED
#शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments