Recents in Beach

For More Details Call On 9673371785

शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यपद्धती


शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यपद्धती 
kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
संपर्क : ८९७५३०७४७०, ९८९००९८२६५ 

शेतकऱ्यांची तडजोडीची क्षमता वाढवण्यासाठी या आधीही अनेक प्रयत्न करण्यात आलेले आहेत. त्यातील एक यशस्वी प्रयोग म्हणजे सहकार. सन १९६०-६१ दरम्यान सहकाराचे चळवळीत रुपांतर झाले. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. परंतु, या सहकाराच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्था सुरू झाल्या होत्या, त्यांचे संपूर्ण हित साधण्यात कमी पडल्या. शेतकऱ्यांनी या संस्थांमध्ये भरभरून सहभाग घेतला आणि सहकार तत्त्व अंगीकारले. परंतु, ज्या लोकांच्या हातात या संस्थांचे नेतृत्व आले, त्यांनी मूळ उद्देश विसरून कामकाज केल्यामुळे आज सहकार मोडकळीस आलेले आपल्याला दिसते. काही सहकारी संस्था तर शेतकऱ्यांच्या जीवावर बांडगुळासारख्या जगतांना दिसतात.

अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रा. वाय. के. अलघ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने भारतीय कंपनी स्थापना कायद्यामध्ये सुधारणा करून प्रोड्यूसर्स कंपनी स्थापना कायदा २००२ निर्माण केला. प्रोड्यूसर्स कंपनी ही सहकार आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संकर आहे. त्यामध्ये सहकार आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चांगले चांगले गुण एकत्र करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रोड्यूसर्स कंपनीचा कायदा बनवण्यात आला आहे.
Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
कडेगांव तालुका शेतकरी उत्पादक कंपनी शेअर्स विक्री सुरु आहे. अधिक माहितीसाठी इमेजवरती क्लिक करा किंवा संपर्क करा ८९७५३०७४७०/ ९८९००९८२६५ 

शेतकरी उत्पादक कंपनी कशा पध्दतीने कार्य करेल?


कंपनी स्थापन करित असतांना ज्या सभासदांना घेवुन ती स्थापन झालेली आहे त्यातुन किंवा बाहेरुन कंपनी एक सी.ई.ओ. (चिफ एक्सिक्युटेव्ह ऑफिसर) ची नेमणुक करतात.कंपनीसाठी सभासदांतुन एक चेअरमन ची नेमणुक करता येते. कंपनी कशा प्रकारे कार्य करेल याची रुपरेषा हि कंपनीच्या आर्टिकल्स आणि मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन मधे नमुद केलेले असावे. याच्या विरोधात जावुन कार्य केल्यास तसे करणा-या पदाधिका-यास किंवा सभासदास शिक्षेची तरतुद कायद्यात तर आहेच पण तशी तरतुद आर्किटक्स आणि मेमोरॅन्डम मधे देखिल करुन ठेवावी. कंपनी च्या नफ्यापैकि काही भाग का कायद्याने कंपनी प्रशासनाने रिझर्व म्हणुन काढुन ठेवणे गरजेचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही शिल्लक राहील ते कंपनीच्या मिटिंग मधे आणि नियमावलीत नमुद केल्याप्रमाणे तसेच कंपनी कायद्याच्या आधीन राहुन सभासदात शेअर च्या किंवा डिविडंट च्या रुपात वाटता येते. कंपनी तिच्या सभासदांना आर्थिक कर्ज देखिल देवु शकते मात्र ते केवळ ६ महिने मुदतीचे असावे लागते. कंपनी चे अंतर्गत लेखापरिक्षण हे मान्यताप्राप्त चार्टड अकाउंटट कडुन करुन घेणे गरजेचे असते. जे कार्य करणारे सभासद असतात त्यांना काही विशेषाधिकार देखिल कंपनी प्रशासन प्रदान करु शकते. कंपनी बोर्डाने वर्षातुन एकदा जनरल मिटिंग घेणे बंधनकारक आहे, त्यामिटिंग ची वेळ ठिकण आणि इतर बाबी सभासदांना कळवणे बंधनकारक आहे. बोर्ड मिटिंग साठी कोरम हा एकुण सभासद संख्येच्या एक त्रित्युआंश जो कमीत कमी ३ असावा. ज्या कंपनीचा सतत तिन वर्ष ५ करोड पेक्षा जास्त टर्नओव्हर होतो त्या कंपनीस पुर्णवेळ कंपनी सेक्रेटरी ठेवणे गरजेचे आहे. असा मनुष्य हा इंस्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया चा सभासद असणे बंधनकारक आहे. कंपनीत किमान ५ तर जास्तीत जास्त १५ डायरेक्टर असावेत. जे कंपनीच्या मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन वर सही करतील ते डायरेक्टर असतात.


#शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण
सर्व शेतकरी व नागरिक आणि बंधू भगिनींनो आपल्या कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. या शेतकरी उत्पादक कंपनीचे शेअर्स विक्री सुरू असून शेअर खालीलप्रमाणे दिले जात आहेत. कंपनीचा एक शेअर १०००/- रुपये या दर्शनी किंमतीचा असून सभासदांना किमान १ शेअर घ्यावे लागेल. त्याची किंमत १,०००/- रुपये एक हजार फक्त. तसेच प्रवेश फी १००/- रुपये शंभर फक्त. असे एकूण ११,००/- रुपये अकराशे फक्त आहे. सदर रक्कम चेक, डीडी, NEFT, इंटरनेट बँकिंगद्वारे कंपनीच्या खात्यावर जमा करावी. पारदर्शकता असावी यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.


अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470, 9890098265, 9960007383
CIN NO. U01400PN2018PTC179761
PAN NO. AAHCK3348P
TAN NO. KLPK03069D
#Kadegaon Taluka Farmers Producer Co. Ltd.


 To Know More Call 9673371785Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments