Recents in Beach

For More Details Call On 9673371785

संकटातही आशेचा उगवला 'किरण'

दर्जेदार, रसाळ द्राक्षांसाठी किलोला ८५ रुपयांचा सौदा पक्का झाला. पण अवकाळी आणि कोरोना या संकटांमुळे व्यापारी दर द्यायला तयार होईनात. अखेर हिंमत एकवटून शेतकऱ्याने नातेवाईक, मित्रांची मदत घेत विविध गावांमधून साडे ११ टनांची विक्री साधली व नुकसान टाळले. पिकण्याबरोबर विकू देखील शकतो हा आत्मविश्‍वास जागृत झाला. प्रयोगशील, प्रयत्नवादी युवा शेतकरी किरण लभडे यांची ही यशकथा.


www.shetisalla.com

नाशिक जिल्ह्यातील निमगाव मढ (ता.येवला) येथील किरण वसंतराव लभडे यांच्या कुटुंबीयांची आठ एकर शेती आहे. येवला तालुका दुष्काळग्रस्त आहे. मात्र प्रयत्नवादी व प्रयोगशील वृत्तीच्या किरण यांनी प्रतिकूलतेतही शेतीची प्रगती साधली आहे. पूर्वी विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर बाजरी, ज्वारी, कांदा, मका, ऊस ही पिके असायची.
किरण यांच्याकडे २००८ च्या सुमारास शेतीची जबाबदारी आली. त्यांनी मेच्या उन्हाळ्यात पूर्वहंगामी टोमॅटो लागवडीपासून प्रयोगांना सुरुवात केली. शेजारून पाणी घेत पीक यशस्वी केले. यातून आत्मविश्वास वाढला. पुढे नातेवाइकांच्या सल्ल्याने मर्यादित पाण्यात द्राक्ष लागवड केली. शेजाऱ्यांकडून पाणी घेऊन बाग जगविली. पहिल्या उत्पादनात चांगले उपन्न मिळविले. यातून बोध घेतला. शेती थोडी करायची, पण नियोजनपूर्वक. मग सिंचन व्यवस्थापन, बदलती पीक पद्धती यांचा अभ्यास करून ती बागायती करण्यावर भर दिला.
सिंचन सुविधांचा विकास
पाण्याची प्रचंड टंचाई होती. शक्य ते भांडवल गुंतवून ७ ते ८ बोअरवेल्स घेतले. लाखभर रुपये खर्च केले. काही उपयोग झाला नाही. मग द्राक्षबागेतील उत्पन्नातून घरापासून सहा किलोमीटरवरील विहीर खोदण्यासाठी एक गुंठा जागा घेतली. तेथून जलवाहिनीद्वारे पाणी आणले. शासकीय अर्थसाहाय्य न घेता १८ गुंठ्यात शेततळे उभारले. सूक्ष्म सिंचन व गरजेनुसार प्रवाही सिंचन केले. प्रत्येक थेंबाचा अचूक वापर हा किरण यांच्या व्यवस्थापनाचा मुख्य गाभा आहे.
द्राक्ष शेतीची वैशिष्ट्ये
 • द्राक्ष बाग घेण्यास सुरुवातीला कुटुंबीयांचा विरोध. मात्र त्यांना विश्‍वासात घेत नातेवाइकांच्या सल्ल्याने बाग उभी केली. पुढे नियोजनपूर्वक विस्तार.
 • सध्या तीन एकरांपैकी थॉमसन व सोनाका प्रत्येकी ३० गुंठे
 • सुधाकर- ६० गुंठे
 • मजुरांच्या उपलब्धतेनुसार तीन टप्प्यात बागांची छाटणी
 • मृदा, पाणी व पानदेठ परीक्षणाद्वारे पाणी व खत व्यवस्थापन
 • आर्द्रता टिकवण्यासाठी पाचट व मक्याचा चारा यांचे जैविक मल्चिंग
 • सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी शेणखत, जीवामृत व द्रवरूप जिवाणू खतांचा वापर
 • रेसिड्यू फ्री द्राक्षनिर्मितीचे उद्दिष्ट.
 • हवामानासंबंधी मोबाईलवर अपडेट्स
निर्यातक्षम उत्पादन
सुरूवातीला स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री व्हायची. पुढे निर्यातक्षम द्राक्षांचे
उत्पादन घेण्यास सुरुवात केली. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. सन २०१६ पासून युरोप, रशिया, बांगलादेश येथे निर्यात करण्यात किरण यांना यश मिळाले.
लॉकडाऊनमध्ये हिंमत दाखवली
 • यंदा पहिल्या टप्प्यात दीड एकरांतील थॉंमसन व सोनाका बाग इलाहाबाद येथील व्यापाऱ्याला प्रति किलो ४२.५० रुपये दराने दिली. दीड एकरांतून १२ टन क्विंटल उत्पादन तर सव्वा चार लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. दुसऱ्या टप्प्यात सुधाकर वाणाची दीड एकर बाग निर्यातदाराला दिली. त्यास प्रति किलो ८५ रुपयांप्रमाणे दर निश्चित झाला.
 • दरम्यान अवकाळी पाऊस व कोरोना ही संकटे उभी ठाकली. लॉकडाऊनमुळे काढणीसाठी आलेले मजूरही परत गेले. निर्यातदारांनी काम थांबविले. व्यापाऱ्यांनी किलोला केवळ ८ ते १० रुपये दर देऊ केला. किरण अत्यंत हताश झाले. सगळच संपलं असं वाटून गेलं. मग कुटुंबीय व मित्रांनी धीर दिला. किरण हिंम्मत एकवटून उभे राहिले. थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला.
असे केले विक्री नियोजन
 • सकाळी ६ ते ८ वेळेत कुटुंबीयांकडून द्राक्षकाढणी
 • दररोज दोन मार्ग निवडले. येवला शहरासह तालुक्यातील नागडे, नगरसूल, अंदरसूल, उंदीरवाडी, चिचोंडी या गावांमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन जाणे. यात मित्र व पेट्रोलपंप व्यावसायिकांकडून मदत.
 • सुधाकर हा वाण अत्यंत रसरशीत, टपोरा असल्याने ग्राहकांकडून चांगली पसंती.
 • दररोज सुमारे एक टन विक्री
 • एकूण विक्री- सुमारे साडे ११ टन.
 • दर- २५ ते ४० रुपये प्रति किलो
 • उत्पन्न- सुमारे ३ लाख
 • आपण केवळ पिकवत नाही तर विकूही शकतो हा आत्मविश्‍वास आला. नफ्याचे प्रमाण अत्यंत घटले. मात्र नुकसान टळले.
पूर्वहंगामी टोमॅटो उत्पादनात हातखंडा
 • दरवर्षी २० ते २५ मेच्या दरम्यान दोन एकरांत टोमॅटो
 • एकरी सुमारे २८ टन उत्पादन
 • प्रामुख्याने बांगलादेशला निर्यात. पिंपळगाव बसवंत, येवला, रवंदा (ता.कोपरगाव) व मागणीप्रमाणे जागेवरही थेट विक्री.
उत्पन्नाचे आदर्श आर्थिक व्यवस्थापन
 • शेतीत नवे तंत्रज्ञान वापरण्यावर भर
 • बॅंकेकडे नियमित वार्षिक परतफेड
 • शेतीतील उत्पन्नातून टुमदार बंगला, यांत्रिकीकरण, मुलांचे शिक्षण, कुटुंबीयांचा विमा व पुढील पीक पद्धतीसाठी आर्थिक नियोजन आदर्श
 • यातूनच आपत्कालीन, वैद्यकीय खर्च, गरज पडल्यास शेती खर्चासाठी रकमेचा विनियोग. त्यातूनच कुटुंबाने आर्थिक स्थैर्यता मिळविली.
 • किरण व पत्नी वैशाली यांच्याकडे शेतीचे नियोजन. वडील वसंतराव, आई सगुणाबाई यांची मदत व मार्गदर्शन. नातू बजरंग व धाकटा शाहू यांच्या शिक्षणांकडे त्यांचे विशेष लक्ष.
ॲग्रोवन मार्गदर्शक
किरण ॲग्रोवनचे दररोजचे वाचक आहेत. त्यातून लेख, तांत्रिक सल्ले, मार्गदर्शन ते घेतात. जुनी कात्रणे संग्रहित केली आहेत. आमच्या प्रगतीत ॲग्रोवनचा मोठा वाटा असल्याचे ते अभिमानाने सांगतात.
संपर्क- किरण लभडे- ९४२१२२६३६९, ९८२२३७३६३३
www.shetisalla.com
For Service Inquiry Call : 9673371785

                 गाईवर झालेला वार्षिक खर्च आणि आलेले उत्पादन यातील फरक पाहावाप्रथम वेतात योग्य आणि परिपूर्ण आहार देऊनही गाईपासून ४५०० लिटर (सरासरी १५ लिटर/प्रति दिन ) उत्पादन  मिळाल्यास ती गाई विकून नवीन खरेदी करावी.
     सर्वात महत्वाचे जास्त दूध देणाऱ्या गाईपासून जास्तीत जास्त कालवडी कश्या मिळतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . आणि विज्ञानामुळे हे शक्य झाले आहेत्यामुळे आपण गाई भरवताना डॉक्टरकडे SEXED SEMEN ची मागणी करावी.
         आपणास आवश्यक असणारे पशु खाद्य आणि इतर बाबी जसे कि खनिज मिश्रण इत्यादी शेतकरी गट तयार करून होलसेल दराने खरेदी करावेतसेच शेण वर्षभर साठवून  ठेवता त्यापासून उत्तम प्रतीचे गांडूळखत बनवुन विक्री करावे किंवा स्वतःसाठी वापरावे. 


www.shetisalla.com *शेतकरी सेवा हाच आमचा ठेवा*

प्रगतिशील शेतकरीकृषितज्ञकृषी शास्त्रज्ञकृषी अधिकारीकृषी संस्थांचे पदाधिकारीकृषी क्षेत्रातील विद्यार्थी  शेतीविषयक माहिती असणारे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या सर्व शेती प्रेमींना आवाहन... बदलत्या दुनियेत डिजिटल माध्यमांनी धूम घातली आहेप्रिंट मीडियाटीव्ही मीडिया यापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर आणि उपयोग वाढला आहेसर्वांना खुले व्यासपीठ मिळत आहेपण या समाज माध्यमांचा दुरुपयोग सुद्धा होत आहेआज प्रत्येक जण लेखक आहेप्रत्येक जण आपले विचार समाज माध्यमातून प्रभावीपणे मांडत आहेजगाच्या अन्नदात्या शेतकऱ्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपले ज्ञानसल्लाकृषीविषयक माहितीमहत्वपूर्ण सल्ला दिल्यास शेती क्षेत्रात सुधारणा होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईलजगाच्या पोशिंद्याला सक्षम करणेसाठी आपले अनमोल ज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहेशेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून हे ज्ञान आणि उपयुक्त माहिती शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहेकृषी क्षेत्रात सकरात्मक बदल घडविणारे आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्याना या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तसेच आपली संकल्पना जगासमोर मांडण्याची संधी आहे.

आपल्या कृषी विषयक संकल्पना तसेच भागातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथानाविन्यपूर्ण प्रयोगशेतीसल्लाउपयुक्त माहिती आपल्या नावसह प्रसिद्ध कराकृषी क्षेत्रात लिखाण करू इच्छिणाऱ्या शेतकरी  तज्ञांनी आपले लेखमाहिती teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती आपले लेख माहिती इमेज/फोटो सह मराठी युनिकोड फॉन्ट मध्ये टाईप केलेले पाठवावे.*मोफत जाहिरात आपली कृषी विषयक उत्पादने  सेवांची मोफत जाहिरात शेती सल्ला या पोर्टलच्या माध्यमातून करू शकतापोर्टलच्या माध्यमातून 1 लक्ष पेक्षा जास्त शेतकर्यांच्यापर्यंत आपली जाहिरात माहिती पोहचवाशेतीविषयक महत्वपूर्ण माहिती  मार्गदर्शनपर लेखांच्या माध्यमातून आपली उत्पादने  सेवांची माहिती पोर्टलवर मोफत प्रसिद्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची संधी आपल्याला शेती सल्ला पोर्टल देत आहेत्वरा कराएका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांशी जोडले जाआपले लेख माहिती जाहिरातीसह teamshetisalla.editor@blogger.com या mail id वरती पाठवा.*अधिक माहितीसाठी संपर्क : 8975307470*

www.shetisalla.com नियम  अटी :

*लेख/आर्टिकल कमीत कमी 100 शब्दांचे असावे.

*सदर लेखाच्या आतमध्ये व्हिडीओ/इमेज  टेक्स्ट स्वरूपात जाहिरात करू शकता.

*लेख हे स्वतःचे असावेकॉपी नसावे.


from News Story Feeds https://ift.tt/2x3CFYU
Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments