Recents in Beach

For More Details Call On 9673371785

जैवविविधतेचे करून संवर्धन उभारले कृषी पर्यटन

बांधकाम व्यावसायिक असलेल्या आनंद बोरसे यांनी आपल्या भागीदारी सहकाऱ्याच्या साह्याने नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी (ता.त्र्यंबकेश्वर) येथे ५० एकर क्षेत्रावर कृषी पर्यटन केंद्र विकसित केले आहे. सुमारे ४० हजारांहून अधिक वृक्षसंपदा व दोनशेहून अधिक देशी झाडे व वनस्पतींचे संवर्धन येथे केले आहे. सर्व सुविधांसह आनंद, मानसिक विरंगुळा देण्याबरोबर निसर्गातील खजाना व अगाध ज्ञानही पर्यटकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला आहे.
बांधकाम व्यावसायिक असलेले नाशिक येथील आनंद बोरसे यांनी आपले मित्र अनिल लोहारकर यांच्या भागीदारीत २००४ मध्ये अंजनेरी (ता.त्र्यंबकेश्वर) येथील डोंगराळ भागात ५० एकर शेती घेतली. निसर्गाचा अधिवास जपणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे व त्या निमित्ताने कृषी पर्यटन असा त्यांचा हेतू होता. अर्थात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत जल व्यवस्थापनाची शाश्‍वत कामे करण्यावर भर दिला. विविध दुर्मीळ वृक्ष, देशी झाडांची रोपे यांचे विविध ठिकाणाहून संकलन सुरू केले. त्यांची लागवड केली. आंब्याच्या झाडांची सुरुवातीच्या तीन वर्षांत वाढ होत नसल्याने तुमचा हा प्रयत्न फसेल असे अनेकांनी सांगितले. मात्र बोरसे खचले नाहीत. जिद्दीने व्यवस्थापन काटेकोरपणे करीत त्यांनी वृक्षसंपदा फुलवण्यास सुरुवात केली. पंधरा वर्षांहून अधिक वर्षांची चिकाटी, तप, परिश्रम व शोधक वृत्ती यातून ५० एकरांतील टेकड्यांच्या प्रदेशात कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्यात यश आले.
असे आहे कृषी पर्यटन केंद्र
 • सुमारे ४० हजारांहून अधिक वृक्षसंपदा
 • दोनशेहून अधिक देशी झाडे व वनस्पतींचे संवर्धन
 • स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक परिसर
 • गीर गायी, ससे, गिनी पिग यांचे संगोपन
 • हजारो पक्षांचा अधिवास, विविध ठिकाणी पक्षीथांब्यांची निर्मिती
 • सुमारे शंभराहून अधिक जातीच्या आंब्याची लागवड
 • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली), आंबा संशोधन केंद्र (गुजरात ), निजामकालीन आंबा नर्सरी (नेकनुरी, उस्मानाबाद ) व स्थानिक ठिकाणाहून रोपे उपलब्ध केली.
 • त्यातूनच ‘चाणक्य ॲग्रो फार्म अँड टुरीझम’ नावाने कृषी पर्यटनाला सुरुवात
 • शहरी पर्यटकांना विरंगुळा, मानसिक समाधान, शेती, निसर्गाचे सांनिध्य मिळावे, जैवविविधतेचे ज्ञान व्हावे ही संकल्पना आहे.
 • www.chanankyaagrotourism.com या नावाने संकेतस्थळ. सोशल मिडीयाद्वारे प्रसार
 • मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत व स्थानिक असे मिळून आठवड्याला सुमारे १५० ते २०० पर्यटक भेटी देतात.
 • जंगल सफारी, योगा व ध्यान धारणा, सेंद्रिय शेती माहिती, शिवार फेरी, ट्रेकिंग, रेन डान्स यांसह बालउद्यान, वडाच्या झाडाचा झोका असे ग्रामीण शैलीचे दर्शन
 • पर्यटकांना हंगामी फळांची विक्री. मराठमोळे भोजन व निवास व्यवस्था
जलव्यवस्थापन
टेकड्यांची जमीन असल्याने पाण्याचे स्रोत मर्यादित आहेत. मात्र दोघे मित्र स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविकाधारक असल्याने तांत्रिक ज्ञानाचा उपयोग केला.
 • डोंगरावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी 'गॅबीअन' पद्धतीच्या छोट्या १० बंधाऱ्यांची निर्मिती
 • या पाण्याची गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाइपद्वारे शेततळ्यांमध्ये साठवणूक
 • तीन शेततळी ( एकूण क्षमता दोन कोटी लीटर )
 • संपूर्ण क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर
 • शेततळ्यांमधील पाणी उपसण्यासाठी सौरपंपांचा वापर
 • उंच भागात पाणीसंचयासाठी सिमेंट टाक्या
 • गुरुत्वाकर्षण पद्धतीने क्षेत्रावर उच्चदाबाने पाणीपुरवठा.
 • सुरुवातीला सहा किमी अंतरावरून जलवाहिनीद्वारे पाण्याची उपलब्धता
ठळक वैशिष्ट्ये
अवशेषांचा पुनर्वापर
शेतात गवत, पालापाचोळा, पीक अवशेष मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्यांचा सेंद्रिय आच्छादन म्हणून वापर होतो. त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढीसही मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात झाडांसाठी आवश्यक आर्द्रता मिळून पाण्याची बचतही मोठ्या प्रमाणावर होते.
सेंद्रिय पद्धतीचा अवलंब
या जमिनीत रासायनिक निविष्ठांचा वापर अजिबात केला जात नाही. शेणखत, गांडूळखत व जीवामृताच्या वापरामुळे आंब्याच्या कलमांची व अन्य झाडांची वाढ चांगली झाली. सुमारे आठ देशी गायी असून त्यांच्या शेणाचा व गोमूत्राचा वापर होतो. गांडूळ खत व कंपोष्ट खत निर्मिती युनिट उभारले आहे.
मोहाच्या झाडांचे विशेष संवर्धन
मोहाच्या झाडाचे औषधी गुणधर्म अभ्यासून ५५० मोहाची झाडे संवर्धित केली आहेत. खाजगी तत्त्वावर ही मोठी लागवड असावी. गावठी करवंदाच्या ४०० ते ५०० जाळ्या आहेत. सागाची साडेचार हजार झाडे आहेत.
विविधतेची झलक
आंब्याच्या काही जाती
पायरी, सुवर्णरेखी, सुंदरी, दशेरी, तोतापुरी, वनराज,राजापुरी, बदामी, चौसा, लंगडा, फैझाली, हिमसागर, सुंदरशाह, बंगनपल्ली, नील, पथोल, शेरी, दिलखुश, रेडीपसंद ,खजुरा, चीकाला, कालापहाड, नूरजहां, नीलम, नवाब, मल्लिका, आम्रपाली, नीलशान, नीलगोवा, मेहमूदबहार, रत्ना, सुवर्णा-जहांगीर, माया, लिली, ऑस्टीन, अर्क-नीलकिरण, बानेशान, वाशी बदामी, पुसा-अरुनिमा, अमृतांग,बारमासी, काळा हापूस, दुधपेढा, नानापोंडा, मधुरवास, आखाडिया, नवनीतम, खोबऱ्या
फळझाडे
सीताफळ, रामफळ, पेरू, चिकू, काजू, चिंच, जांभूळ, अंजीर, केळी, लिंबू, करवंद, बोर, नारळ, संत्री, मोसंबी, फणस, पपई,
औषधी वनस्पती
हिरडा,हळद,बेहडा,अर्जुनसादाडा, रुद्राक्ष, बेल, चंदन, तुळस, कामयानी, सब्जा, शिकेकाई, रिठा, शिवन, मोह, खैर, पळस, गुळवेल, काटेसाबर, वड, पिंपळ, सुपारी, आपटा, भोकर, ईडलिंबू , शेवगा, कण्हेर, दहीखुडी, ओवा, अडुळसा, अंजन, कवठ, तेजपान, कढीपत्ता
फुलझाडे
 • गुलमोहर, चाफा, मोगरा, जास्वंद, गुलाब, गुलछडी, सोनचाफा,सदाफुली, पारिजातक, बकुळ आदी
 • यांसह १० प्रकारच्या बांबूची लागवड शेताच्या सीमेलगत
सेंद्रिय आंब्याचे मार्केटिंग
 • ‘चाणक्य फार्म प्रॉडक्ट’ नावाने आंब्याचा ब्रँड
 • रसायन अवशेषमुक्त व सेंद्रिय प्रमाणीकरण
 • ३०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री
 • सेंद्रिय पद्धतीने पिकवणी
 • आंब्यांचा गंध, स्वाद वेगळी असल्याने ग्राहकांची विशेष पसंती
 • मुंबई, पुणे,औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिक सह गुजरात राज्यात मागणी
संपर्क- आनंद बोरसे :९१५८०६०६६६
अनिल लोहारकर : ९७७३३३२२४५

Donate And Get Tax Exemption
सामाजिक उपक्रमांना आर्थिक योगदान द्या आणि इन्कमटॅक्स मध्ये सूट मिळवा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click On Donate Button and get 50 % Tax Exemption or click below link to know more
For More Information Click Here


Kadegaon Taluka Farmers Producer Company Limited
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७०/९८९००९८२६५ या नंबरवर कॉल करा.

17 Ready made project proposals for ngo
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा ८९७५३०७४७० या नंबरला संपर्क करा.

Post a Comment

0 Comments